AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : क्राइस्टचर्चच्या पीचवर टॉसचा फॅक्टर महत्वाचा, गिलने टॉस जिंकल्यावर पहिली बॅटिंग घ्यावी की बॉलिंग? उद्यापासून सेकंड टेस्ट

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंडमध्ये उद्यापासून दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. त्यामुळे दुसरा कसोटी सामना सीरीजचा निकाल ठरवणारा असेल. दोन्ही टीम्स ही टेस्ट जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतील.

IND vs NZ : क्राइस्टचर्चच्या पीचवर टॉसचा फॅक्टर महत्वाचा, गिलने टॉस जिंकल्यावर पहिली बॅटिंग घ्यावी की बॉलिंग? उद्यापासून सेकंड टेस्ट
Team india Image Credit source: PTI
| Updated on: Nov 26, 2026 | 8:34 AM
Share

भारत आणि न्यूझीलंडमध्ये टेस्ट सीरीजचा दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना क्राइस्टचर्चमध्ये होणार आहे. 27 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या टेस्ट मॅच मध्ये दोन्ही टीम्ससाठी विजय आवश्यक आहे. कारण पहिला कसोटी सामना अनिर्णीत सुटला होता. सीरीजची ट्रॉफी विभागून घेण्याऐवजी ती जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला विजयाची संधी जास्त होती. भारताने पहिल्या डावात 700 पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारला होता. पण शेवटच्या दिवशी टीम इंडियाला न्यूझीलंडच्या संघाला ऑलआऊट करता आलं नाही. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने पत्रकार परिषद घेतली. त्यात त्याने टॉस बद्दल आपली भूमिका मांडली.

न्यूझीलंडचा ओपनर आणि कॅप्टन टॉम लॅथमच्या मते टॉसची भूमिका महत्वाची राहणार आहे. क्राइस्टचर्चच्या हेगले पार्कमध्ये टॉसची भूमिका महत्वाची असेल. कारण टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनकडे बॅटिंग किंवा बॉलिंगचा ऑप्शन निवडण्याचा पर्याय असेल. क्राइस्टचर्चच्या हेगले ओवल वरील टॉसचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. या मैदानात डिसेंबर 2014 ते डिसेंबर 2025 दरम्यान एकूण 15 टेस्ट मॅच खेळल्या गेल्या. त्यात 14 वेळा टॉस जिंकणाऱ्या टीमने पहिला गोलंदाजीचा निर्णय घेतला.

या पीचचा रेकॉर्ड काय ?

हेगले पार्कमध्ये ज्या 15 टेस्ट मॅच झाल्या आहेत, त्यात जय-पराजयाचं गणित समजून घ्यायचं झाल्यास पहिली बॅटिंग करणारी टीम चार वेळा जिंकली आहे, तेच पहिली गोलंदाजी करणाऱ्या टीमने नऊ सामने आपल्या नावावर केले आहेत. 15 पैकी 2 कसोटी सामने ड्रॉ झाले.

भारताचे बॉलिग कोच मॉर्ने मॉर्केल काय म्हणाले?

आता प्रश्न हा येतो की, टॉस जिंकणारी टीम क्राइस्टचर्चच्या हेगले ओवल मैदानावर गोलंदाजी का निवडते? त्या मागचं कारण आहे हेगलेचा पीच. या खेळपट्टीवर हिरवं गवत आहे, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. टीम इंडियाचे बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल सुद्धा हेगले ओवलचा पीच पाहिल्यानंतर याबद्दल बोलले. खेळपट्टी खूप हिरवी दिसतेय. हेगले ओवलचा पीच क्यूरेटर जाएडन तोहिल नुसार फलंदाज आणि गोलंदाज दोघांना अनुकूल आहे. म्हणजे या पीचवर फलंदाज आणि गोलंदाज दोघांना समान संधी असेल.

Follow Us
गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा
Abhijeet Dipke : गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा सवाल
पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती स्पष्ट करा; हायकोर्टाचे आदेश
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर