AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सात वर्षांनंतर मराठमोळ्या अभिनेत्रीची मायदेशी घरवापसी; 2 आठवड्यांत घरातील सामान विकून केलं पॅकअप

‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री नेहा गद्रे तब्बल सात वर्षांनंतर पती आणि मुलासह कायमची भारतात परतली आहे. ऑस्ट्रेलियातील स्थायिक आयुष्य सोडण्यामागचं कारण तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

सात वर्षांनंतर मराठमोळ्या अभिनेत्रीची मायदेशी घरवापसी; 2 आठवड्यांत घरातील सामान विकून केलं पॅकअप
मराठी अभिनेत्री नेहा गद्रेImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 26, 2026 | 8:30 AM
Share

मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार लग्नानंतर परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. ‘मन उधाण वाऱ्याचे’ आणि ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकांमधून नेहाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं होतं. मात्र, लग्नानंतर ती ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आणि अभिनय क्षेत्रापासून दूर गेली. आता तब्बल सात वर्षांनंतर नेहाने पती आणि मुलासह कायमस्वरूपी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशातील सुखवस्तू आयुष्य सोडून मायदेशी परतण्यामागचं कारणही तिने सांगितलं आहे.

2019 मध्ये बांधली होती लग्नगाठ

नेहा गद्रेनं 2 मार्च 2019 रोजी ईशान बापट याच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ती पतीसह ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. यानंतर तिने अभिनयातून ब्रेक घेतला. जवळपास सात वर्षे ती ऑस्ट्रेलियात राहत होती. दरम्यान, 10 फेब्रुवारी 2025 रोजी नेहा आणि ईशान यांच्या आयुष्यात एका गोंडस मुलाचं आगमन झालं. मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या आयुष्यात नवा आनंद आला. मात्र, या संपूर्ण प्रवासात कुटुंबापासून दूर राहण्याची खंतही त्यांना जाणवत होती.

कुटुंबापासून दूर राहणं खटकत होतं

नेहाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भारतात परतण्यामागचं कारण सांगितलं. ती म्हणाली की, गरोदरपणाच्या संपूर्ण प्रवासात तिने आणि ईशानने आपल्या कुटुंबाला खूप मिस केलं. नेहाची आई तिच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियात आली होती. मात्र, व्हिसासह इतर काही कारणांमुळे ईशानच्या आई-वडिलांना तिथे येणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळे कुटुंबीयांसोबत राहण्याची इच्छा अधिक तीव्र झाली. आता भारतात परतल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचंही तिने सांगितलं.

पहा फोटो-

अवघ्या दोन आठवड्यांत केलं पॅकअप

भारतात परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत त्यांनी ऑस्ट्रेलियातील संसाराचा पसारा आवरला. याबद्दल ईशान म्हणाला की, हा निर्णय अजिबात सोपा नव्हता. दोन आठवड्यांत घरातील सामान विकणं, तिथल्या सर्व गोष्टींची व्यवस्था करणं आणि भारतात परतणं हे मोठं आव्हान होतं. मात्र, भारतात परतण्याची त्याची मनापासून इच्छा होती. त्यामुळे त्याने सर्व गोष्टी वेगाने पूर्ण केल्या. ईशानने असंही सांगितलं की, ऑस्ट्रेलियातील ठराविक आणि व्यावसायिक आयुष्यापेक्षा भारतात आपल्या माणसांसोबत राहून आयुष्याचा आनंद घेण्याची त्यांची इच्छा होती.

ईशान जवळपास दहा वर्षे ऑस्ट्रेलियात राहिला होता. त्याआधी तो अनेक वर्ष दुबईमध्ये होता. त्यामुळे कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो भारतात फारसा राहिलाच नव्हता. त्यामुळे मायदेशी परतण्याची त्याला माझ्यापेक्षा जास्त उत्सुकता होती, असं नेहाने स्पष्ट केलं. याविषयी नेहा पुढे म्हणाली की, ऑस्ट्रेलियातील सात वर्षांचा प्रवासही आमच्यासाठी खूप छान होता. तिथे आम्ही अनेक सुंदर आठवणी जपल्या. मात्र, आता भारतातच राहण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे. दरम्यान, नेहा पुन्हा अभिनयक्षेत्रात सक्रिय होणार का, याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. तिच्या मायदेशी परतण्याच्या निर्णयामुळे तिला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांना आशा आहे.

Follow Us
गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा
Abhijeet Dipke : गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा सवाल
पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती स्पष्ट करा; हायकोर्टाचे आदेश
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर