‘पंढरीची वारी’ सिनेमातील ‘विठेबा’ आठवतोय? पुण्यात तरुणपणीच घेतला अखेरचा श्वास…, मृत्यूने सगळेच हैराण

पंढुरंगाचा महिमा सांगणारे अनेक सिनेमे रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाले. पण सर्वांच्याच लक्षात राहणारा सिनेमा म्हणजे 'पंढरीची वारी', सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांचं असं म्हणणं होतं की, वारीत गेलं नाही तरी, सिनेमा पाहिल्यानंतर वारीचा अनुभव येतो. पण तु्म्हाला सिनेमातील 'विठोबा' आठवतोय का? त्याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसलेला.

| Updated on: Jul 24, 2026 | 3:04 PM
1 / 5
'पंढरीची वारी' सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, आषाढी एकादशीचा दिवस आला की, सिनेमा टीव्हीवर लागतोच. 1988 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात 'विठोबा'ची भूमिका साकारणाऱ्या मुलाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.  पण तो शेवटी सर्वांना रडवून गेला.

2 / 5
ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती. बाळ धुरी, नंदिनी, राघवेंद्र काडकोळ, राजा गोसावी, अशोक सराफ अशा अनेक दिग्गज कलाकारांनी सिनेमात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. पण सगळ्यांच्या लक्षात राहतो तो म्हणजे या सिनेमाताला 'विठोबा'

3 / 5
सिनेमात विठोबा ही भूमिका बालकलाकार बकुल कवठेकर यानं साकारली होती. बकुल कवठेकर यानं सिनेमाच्या माध्यमातून सर्वांना जगण्याची एक वेगळी दिशा दाखवली. पण त्याच्या निधनानंतर चाहत्यांना फार मोठा धक्का बसला.  शिक्षण घेत असतात बकुल याचं निधन झालं.

4 / 5
सांगायचं झालं तर, रमाकांत कवठेकर यांचा मुलगा बकुल याचं तरुणपणीच निधन झालं. बकुल पुण्यात शिक्षण घेत होता. पुण्यात शिक्षण सुरू असतानाच त्यानं 2002 मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. फार लवकर त्याने जगाचा निरोप घेतला.

5 / 5
 बकुलचा भाऊ समीर कवठेकर सिनेविश्वात कार्यरत आहे. बकुल फिल्म्स या नावाची त्यांची निर्मिती संस्था देखील आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी, 'स्वराज्यजननी जिजामाता', राजा शिवछत्रपती यांसारख्या मालिकेसाठी त्यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us