
'अशी ही बनवाबनवी' हा सिनेसृष्टीमधील हिट सिनेमा आहे. या सिनेमामध्ये अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुख्य भूमिका आहेत. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात तुफान गाजलेला आणि कायम लोकप्रिय ठरलेला हा सिनेमा आहे. आता या चित्रपटातील घिबली स्टाईल फोटो व्हायरल झाले आहेत. ते पाहून तुम्हाला सिनेमातील डायलॉग आठवतात का सांगा...

'अशी ही बनवाबनवी' सिनेमामध्ये राहायला घर मिळावं यासाठी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर हे दोघं स्त्री वेशांतर करतात. स्त्री वेशांतर केल्यावर लक्ष्मीकांत बेर्डे हे पडद्यावर अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका साकारतात.

घरमालकीणीला पत्नीची ओळख करून देताना अशोक सराफ हे चुकून ‘हा माझा बायको पार्वती’ असं म्हणतात. हा डायलॉग डोळ्यांसमोर आला तर आजही प्रेक्षक पोट धरून हसतात.

'अशी ही बनवाबनवी'मधील अनेक डायलॉग आहेत जे प्रेक्षकांच्या आजची लक्षात आहेत.

आता हे Ghibli फोटो पाहून तुम्हाला हे डायलॉग आठवले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा..