
राज्य बांबू विकास मंडळाच्या उपक्रमांतर्गत नागपूर येथील प्रसिद्ध साईमंदिरात बांबूंचं आकर्षक मंदिर साकारण्यात आलं आहे.

या मंदिरासाठी सिमेंट, लोखंड अथवा कोणताही धातू न वापरता 100 टक्के बांबूंचा वापर करण्यात आला आहे.

पर्यावरणाचं रक्षण, बांबूबाबत जनजागृती व्हावी, यासाठी हे मंदिर साकारण्यात आलं आहे.

महाराष्ट्र सरकारचं बांबू विकास मंडळ आणि आनंद फिस्के यांच्या ग्रीन प्लॅनेट फाऊंडेशनकडूनने हे मंदिर साकारलं आहे.

केवळ बांबू वापरुन मंदिर तयार करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे साईमंदिर ट्रस्टच्या सचिवांनी सांगितले.