

ऑस्ट्रेलिया संघामध्ये एका भारतीय वंशाच्या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूचे वडिल ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथे टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करतात.

या भारतीय वंशाच्या खेळाडूचं नाव तनवीर सांघा असं आहे. लेग स्पिनर असलेल्या तनवीरला कांगारूंनी आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे.

तनवीर सांघा ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी गुरिंदर सिंह यांनी ऑस्ट्रेलियाकडून दोन वन डे सामने खेळले होते.

ऑस्ट्रलियाचा वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेला संघ :- पॅट कमिंस (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, एरॉन हार्डी, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा, स्टीव स्मिथ , मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जाम्पा.