Weaken Immunity : आहारात ‘हे’ 5 पदार्थ टाळा; नाही तर रोगप्रतिकारक शक्ती होईल कमी!

कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे. मात्र, आपल्याला हे माहिती आहे का? की, कोणते पदार्थ खाल्ल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. आपल्या आहारात अतिरिक्त साखरेचे सेवन करू नका.

1/5
कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे. मात्र, आपल्याला हे माहिती आहे का? की, कोणते पदार्थ खाल्ल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. आपल्या आहारात अतिरिक्त साखरेचे सेवन करू नका. कारण जास्त साखर आरोग्यास हानिकारक आहे. ज्या गोष्टींमध्ये साखर जास्त असते त्या शरीरात साखरेची पातळी वाढवण्याचे काम करतात. साखरेचे अधिक सेवन केल्यामुळे एंटी-इंफ्लेमेटरीचे प्रमाण वाढते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.

2/5
पॅकेज केलेले चिप्स, बेकरीमधील खाद्यपदार्थ यांच्यामध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. शरीरात जास्त प्रमाणात मीठ जळजळ होण्यास कारणीभूत ठरू शकते. मीठामध्ये सोडिअम असते, जे आपल्या शरीराला आवश्यक असते. पण त्याचे अधिक सेवन हृदयासाठी घातक ठरु शकते. मिठातले सोडिअम शरीरातील पाणी शोषते. विशेष म्हणजे मीठ रोगप्रतिकारक प्रणालीवर परिणाम करते. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. सध्याच्या कोरोना काळात अतिरिक्त प्रमाणात मीठ खाणे पूर्णपणे टाळाच.

3/5
तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळलेच पाहिजे. तळलेले पदार्थ खाल्ल्याने आपले वजन वाढण्याची शक्यता असते. तळलेल्या पदार्थांमध्ये एजीई जास्त प्रमाणात असल्याने, यामुळे दाह आणि सेल्युलर पेशींचे नुकसान होते. याचा परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. एजीईचा सेवन कमी करण्यासाठी फ्रेंच फ्राईज, बटाटा चिप्स, तळलेले चिकन, पॅन-फ्राइड स्टीक, तळलेल्या फिश यासारखे पदार्थ खाणे टाळा.

4/5
कॉफी आणि चहामध्ये अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. परंतु जास्त प्रमाणात कॅफिन सेवन केल्याने आपल्या झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो. ज्याचा सरळ परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर पडतो. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी चहा आणि कॉफी नियंत्रित प्रमाणात प्या. कॉफी आणि चहामध्ये साखरेचे प्रमाण देखील अधिक असते. झोपेच्या 6 तास अगोदर तुम्ही चहा आणि कॉफी पिऊ शकता, यामुळे तुम्हाला झोपण्यास मदत होईल. मात्र, झोपण्याच्या एक - दोन तास अगोदर चहा आणि कॉफी पिऊ नका.

5/5
काही अभ्यासांमध्ये असे सांगितले आहे की, मद्यपान केल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम पडतो. यामुळे न्यूमोनिया आणि श्वसन समस्यांसारख्या आजाराची शक्यता वाढते. यामुळे सध्याच्या कोरोनाच्या काळात मद्यपान करणे टाळा. या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असा पदार्थांचा समावेश करा. आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपण कोरोनापासून देखील दूर राहू शकतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI