
लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या निकालापूर्वी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

आचार्य सत्येंद्र दास यांच्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रभू राम यांची विशेष कृपा आहे. हेच कारण आहे, ज्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होतील.

पुजारी म्हणाले, '4 जून रोजी निकाल समोर येणार आहे. तेव्हाच निश्चित होणार आहे की, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील...'

आचार्य म्हणाले, प्रभू श्री राम यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर देखील पीएम मोदी आले होते. त्यांनी प्राण प्रतिष्ठा केली. पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रभू राम यांची कृपा आहे.

पुढे आचार्य म्हणाले, 'आम्ही रोज भाजपची सत्ता यावी म्हणून प्रार्थना करत आहोत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत...'