
बोनस शेअर देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत अजून एक नाव जोडल्या गेले आहे. बीटुबी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड, B2B Software Technologies Ltd ही कंपनी गुंतवणूकदारांना मालामाल करणार आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांना बोनस शेअर आणि डिव्हिडंड देण्याची सुद्धा घोषणा करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या कुंडलीत राजयोग तयार झाला आहे.

बीटुबी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी लिमिटेडने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, 10 रुपयांची फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरवर कंपनी एक शेअर बोनस देईल. कंपनीने या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट पुढील आठवड्यातील जाहीर केलेली आहे. ही कंपनी पहिल्यांदाच तिच्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देणार आहे.

एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, बीटुबी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीने 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या एका शेअरवर एक रुपयांचा डिव्हिडंड देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने 6 फेब्रुवारी 2026 रोजी त्यासाठीची रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. पात्र गुंतवणूकदारांना 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2026 या काळात डिव्हिडंड देण्यात येईल. कंपनी पहिल्यांदा लाभांश देणार आहे.

शुक्रवारी बीटुबी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीत तेजी दिसून आली. कंपनीच्या शेअरमध्ये एक टक्क्याची वाढ दिसली. हा शेअर शुक्रवारी 34.15 रुपयांवर बंद झाला. या वर्षात या शेअरमध्ये आतापर्यंत 19 टक्क्यांची तेजी दिसली. 1 वर्षात कंपनीच्या शेअर्सचा भाव 9.60 टक्क्यांनी वधारला.

B2B Software Technologies कंपनीचा 52 आठवड्यातील उच्चांक 36.80 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांक 22.50 रुपये इतका होता. या कंपनीचे मार्केट कॅप 37.52 कोटी रुपये आहे. गेल्या पाच वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 141 टक्क्यांनी वाढली आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.