
बल्गेरियातील प्रसिद्ध भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांनी 2025 साठी एक भयानक भविष्यवाणी केली होती, ज्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. त्यांच्या ‘डबल फायर’ अर्थात ‘दुहेरी आग’ या भविष्यवाणीने लोकांना विचार करायला भाग पाडले आहे की ऑगस्टमध्ये खरंच काहीतरी वाईट घडणार आहे का? ‘बाल्कनची नॉस्ट्रॅडॅमस’ अशी ओळख असलेल्या बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या अनेकदा अस्पष्ट असतात, तरीही त्या थरकाप उडवणाऱ्या असतात. आता त्यांच्या ‘दुहेरी आग’ दाव्याने लोकांच्या झोपा उडाल्या आहेत. त्यांनी सांगितले होते की आकाशातून आणि जमिनीवरून एकाच वेळी दुहेरी आग उफाळेल. या रहस्यमयी भविष्यवाणीचे लोक वेगवेगळे अर्थ काढत आहेत. चला जाणून घेऊया त्याविषयी..

‘दुहेरी आग’चा अर्थ काय असू शकतो? काही लोकांचा विश्वास आहे की ‘जमिनीची आग’ म्हणजे जंगलांमध्ये लागणाऱ्या भयंकर आगी. तर ‘आकाशातून आग’ याचा अर्थ उल्कापिंड किंवा सूर्यापासून निघणाऱ्या शक्तिशाली सौर ज्वाळांशी जोडला जात आहे.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीमुळे लोक दहशतीत आहेत, कारण 2025 मध्ये अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील जंगलांमध्ये भयंकर आगी लागल्या आहेत. याशिवाय, अंतराळ संस्थांनी उल्कापिंडांबाबतही अनेक धक्कादायक दावे केले आहेत.

काही लोक याला प्रतीकात्मक मानतात. त्यांच्या मते, ‘आकाशाची आग’ ही कदाचित एखाद्या दिव्य संदेशाचे प्रतीक असू शकते, तर ‘जमिनीची आग’ युद्ध, पर्यावरणाचा नाश आणि नैतिक अधःपतन यासारख्या मानवी चुकांना दर्शवते.

बाबा वेंगा यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा होते. त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता आणि त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी 5079 पर्यंतच्या घटनांची भविष्यवाणी केली होती, त्यापैकी अनेक खऱ्या ठरल्या आहेत. त्यांनी सोव्हिएत युनियनचे विघटन, 9/11 हल्ला आणि चेर्नोबिल आपत्ती यांची अचूक भविष्यवाणी केली होती.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)