
बाबा वेंगा आज हयात नसले तरीही त्यांनी पुढच्या कित्येक वर्षांची भविष्यवाणी अगोदरच करून ठेवलेली आहे. त्यांनी केलेल्या बऱ्याच भविष्यवाण्या खऱ्याखुऱ्या ठरल्या आहेत. म्हणूनच त्यांची एखादी भविष्यवाणी समोर आली की? जगभरात त्याची चर्चा होते.

2025 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. आता 2026 हे वर्ष सुरू होणार आहे. या सालात नेमकं काय काय होणार? याची भविष्यवाणी आता बाबा वेंगा यांनी केली आहे. त्यांच्या भविष्यवाणीनुसार 2026 या सालात अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत.

बाबा वेंगा यांच्या भविष्यावाणीनुसार 2026 साली अनेक नैसर्गिक संकटं येणार आहेत. या साली जगात एक मोठं नैसर्गिक संकट येणार आहे. या संकटामुळे जगातील अनेक देशांमध्ये नुकसान होणार आहे. भूकंप, अतिवृष्टी, ज्वालामुखीसारखं संकटं येण्याची बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली आहे.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2026 या साली पूर्वेकडील देशांमध्ये मोठं आणि विनाशकारी युद्ध सुरू होणार आहे. नंतर हे युद्ध संपूर्ण जगभर पसरण्याची शक्यता आहे. या युद्धामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी होणार आहे. या युद्धामुळे जगात मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे, असे बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत म्हटलेले आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.