Baba Venga: बक्कळ पैसा आणि नशिबाची साथ! बाबा वेंगांच्या भाकितानुसार ‘या’ ५ राशींचे नशीब पालटणार
Baba Venga: बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार पाच राशींना मोठा लाभ होणार आहे. या पाच राशी कोणत्या आहेत? त्यामध्ये तुमची रास तर नाही ना एकदा चेक करा.

जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा (Baba Vanga) यांची भाकिते नेहमीच चर्चेत असतात. ज्योतिषीय विश्लेषणासह त्यांच्या भाकितांचा आधार घेतला असता, 27 एप्रिल ते 3 मे हा आठवडा काही खास राशींसाठी 'गोल्डन पीरियड' ठरणार आहे. या काळात 5 राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या मोठ्या संधी मिळण्याचे योग आहेत. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी:

मीन (Pisces): गुंतवणूक आणि आर्थिक स्थैर्य लाभेल. मीन राशीसाठी हा आठवडा सुखद आणि उत्साहाचा असेल. गुंतवणुकीचे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा आठवडा शुभ आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणे सोपे जाईल. शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जुन्या समस्यांपासून सुटका होऊन मन हलके होईल.

कन्या (Virgo): अडकलेले पैसे परत मिळतील. कन्या राशीच्या व्यक्तींच्या अनेक इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. बऱ्याच काळापासून कोणाकडे अडकलेले किंवा थकीत असलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. स्वतःचे घर किंवा जमीन घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा काळ गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील, ज्यामुळे मानसिक समाधान लाभेल.

कर्क (Cancer): आर्थिक समृद्धी आणि कौटुंबिक आनंद मिळेल. एप्रिलचा शेवटचा आणि मे महिन्याचा पहिला आठवडा कर्क राशीसाठी पैशांच्या बाबतीत खूप सकारात्मक असेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्या भविष्यात पदोन्नतीसाठी कारणीभूत ठरतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्रांसोबत सहलीचे किंवा प्रवासाचे बेत आखले जातील.

वृषभ (Taurus): कामात यश आणि कायदेशीर दिलासा मिळेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्योदयाचा आहे. तुमची रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील. जर तुमचे काही कायदेशीर वाद सुरू असतील, तर त्यात तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल आणि करिअर निवडीसाठी नवीन उत्तम मार्ग समोर येतील.

धनु (Sagittarius): नवीन व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ सर्जनशीलतेचा आणि नवीन सुरुवातीचा आहे. नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर २७ एप्रिल ते ३ मे हा काळ अत्यंत शुभ आहे. गुंतवणुकीतून भविष्यात मोठा नफा होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)