
महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यतींना (Bullock Cart Race) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सशर्त परवानगी दिली आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत असून बैलगाडा मालकांमध्ये उत्साह संचारला आहे. कुठे फटाक्यांच्या आतषबाजीने तर कुठे ढोल ताशाच्या गजरात 'सर्जा-राजा'च्या पुनरागमनाचं स्वागत होत आहे.

Bailgada Race

Bailgada Race

ग्रामीण भागात बैलाच्या मालकांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते. त्यामुळे बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यासाठी बैलांना प्रशिक्षण दिलं जातं. बघ्यांसाठी पर्वणी असलेल्या बैलगाडा शर्यतींसाठी बैलांची वर्षभर खास काळजी घेतली जात असे.

चंद्रपुरात जागेअभावी प्रत्येक बैलगाडा वेगवेगळी धावत असे, आणि त्यांची वेळ मोजून निकाल लावला जात असे. तामिळनाडूत रेकला क्लबने जानेवारी महिन्यात पोंगल साजरा करताना बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले होते. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये परवानगी असताना महाराष्ट्रात का नाही? असा सवाल विचारला जात असे.

बैलांवर अन्याय होतो, या कारणाने बैलगाडा शर्यती बंद झाल्या नव्हत्या. तर बैलाचा समावेश पाळीव प्राण्यामध्ये केला जातो. पाळीव प्राण्यांना शर्यत किंवा प्रदर्शनात बंदी आहे, या कारणाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आली होती, अशी माहिती आहे.