मोठा जॅकपॉट! 1 शेअरवर 150 रुपयांचा डिव्हिडंड… या कंपनीने जाहीर केली रेकॉर्ड डेट
Share Market Dividend: शेअर बाजारात सध्या या स्टॉकची चर्चा आहे. कारण या कंपनीने 1 शेअरवर 150 रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला आहे. त्यासाठी या महिन्याची रेकॉर्ड डेटही जाहीर करण्यात आली आहे. कोणती आहे ही कंपनी?

ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी Bajaj Auto Company ने डिव्हिडंडची घोषणा केली आहे. कंपनी रेकॉर्ड डेटपर्यंत पात्र शेअरधारकांना 150 रुपयांचा डिव्हिडंड देईल. त्यासाठी कंपनीने या महिन्याच्या अखेरीस रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.

बजाज ऑटो लिमिटेडने स्टॉक एक्सचेंजला याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार पात्र गुंतवणूकदारांना 150 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. या लाभांश साठी कंपनीने 29 मे 2026 ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली आहे. म्हणजे ज्या शेअरधारकांकडे या तारखेपर्यंत शेअर असतील त्यांना लाभांश मिळेल.

गेल्यावर्षी बजाज ऑटो लिमिटेडने गुंतवणूकदारांना 210 रुपयांचा डिव्हिडंड जाहीर केला होता. 2024 मध्ये कंपनीने प्रत्येक शेअरवर 80 रुपयांचा लाभांश जाहीर केला होता. कंपनीने सर्वात अगोदर 2008 मध्ये डिव्हिडंड दिला होता. तेव्हा गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 20 रुपयांचा डिव्हिडंड मिळाला होता.

कंपनीने 2010 मध्ये शेअरधारकांना पहिल्यांदा आणि अखेरीस बोनस शेअर दिला होता. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीने बोनस शेअर दिला नाही. त्यावेळी एका शेअरवर एक शेअर बोनस म्हणून दिला होता. आता कंपनी डिव्हिडंड देणार आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.

बीएसईवर शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअर 0.70 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 10,378.10 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या 6 महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 17 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या वर्षी या स्टॉकने गुंतवणूकदारांना 24 टक्के रिटर्न दिला होता.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.