
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात सध्या चर्चेत आहेत.

जयश्री थोरात या बाळासाहेब थोरात यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. एक वर्षांपूर्वीचं राजकारणात त्यांनी दमदार एन्ट्री घेतली.

आजही त्या वडिलांसाठी निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. विधानसभा निवडणुकीची बाळासाहेबांवर मोठी जबाबदारी आहे. त्यांच्यावतीने मतदारसंघ पिंजून काढण्याचे काम जयश्री थोरात करीत आहेत.

संगमनेर काँग्रेसच्या युवती अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय इनिंगला सुरुवात केली. त्यांच्या रुपाने थोरात कुटुंबातील तपिढी राजकारणात आली आहे

बाळासाहेब थोरात यांची राजकीय वारसदार म्हणून जयश्री थोरात यांच्या नावाची अनेकदा चर्चा झाली आहे.

डॉ. जयश्री थोरात या कर्करोग तज्ज्ञ आहेत. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ब्लड कॅन्सरच्या विषयात एमडी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमधील ब्लड कॅन्सर विभागात सेवा दिली आहे. त्यांचे पती हसमुख जैनही डॉक्टर आहेत.

तसेच त्या एकविरा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्य करत आहेत.

जयश्री थोरात या आपल्या वडिलांच्या मागे अगदी खंबीरपणे उभ्या आहेत.

नुकतेच सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात हे आमदार होणार नाहीत, असे विधान केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना लेक बापाच्या बाजून जबदस्त भिडलेली पाहायला मिळाली.