
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अविका गोरने बुधवारी तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी देऊन आश्चर्यचकित केलं. अविका गोरने बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानी सोबत साखरपुडा उरकला आहे.

अभिनेत्री अविकाने मिलिंदसोबतच्या तिच्या साखरपुड्याचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये दोघे खूप आनंदी दिसत आहे आणि दोघेही एकमेकांकडे हसत आहेत.

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले - "त्याने विचारलं... मी हसलं, रडलं आणि नंतर ओरडले - माझ्या आयुष्यातील सर्वात सोपा हो! मी पूर्णपणे फिल्मी आहे - पार्श्वसंगीत, स्लो मोशन, फ्लोइंग मस्कारा, सर्वकाही." यासोबतच तिने #Engaged आणि #Rokafied सारखे हॅशटॅग लिहित अभिनेत्रीने साखरपुड्याची घोषणा केली आहे.

अविका आणि मिलिंद यांच्या साखरपुड्याचे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. फोटोंमध्ये अविका पेस्टल गुलाबी रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे, तर मिलिंदने मॅचिंग कुर्ता घातला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अविका आणि मिलिंद एकमेकांना डेट करत आहेत. अखेर दोघांचा साखरपुडा झाला असून लग्न कधी करणार अद्याप सांगितलेलं नाही.