लोककला ,संस्कृती , धार्मिक प्रथा- परंपरेचा सुंदर संगम, तळकोकणात शिमगोत्सव साजरा

| Updated on: Mar 23, 2022 | 11:23 AM

पारंपरिक लोककला व संस्कृती आणि धार्मिक प्रथा- परंपरा वैशिष्ट्यपूर्णरित्या जोपासत तळकोकणात मोठ्या उत्साहात शिमगोत्सव साजरा होतो.

1 / 5
पारंपरिक लोककला व संस्कृती आणि   धार्मिक प्रथा- परंपरा वैशिष्ट्यपूर्णरित्या जोपासत तळकोकणात मोठ्या उत्साहात शिमगोत्सव साजरा होतो. कोकणातील गावोगावी या अशा अनोख्या परंपरा खास शिमगोत्सवात पाहायला मिळतात.

2 / 5
अशाच पद्धतीने साटेली गावातील जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या साटेली गावातील श्री देवी शांतादुर्गा देवी सातेरी, देव पुरमार,देव चाळोबा, देवस्थान शिमगोत्सव मधिल सहा दिवशी साजरी होणारे व वेगळे आकर्षण असलेला घोडमोडणी उत्सव मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला.

3 / 5
पुंडलिका वरदा हरी विठ्ठल जयघोषात रंगाची उधळण करत  ढोलताशांच्या गजरात श्री देवी शांतादुर्गा मंदिराच्या प्रांगणात सुरुवात करण्यात आली. घोडमोडणी उत्सव आवाडा येथील श्री देव चाळोबा देवस्थान येथे पार पडतो.यावेळी सातेरी मंदिर येथून निघालेल्या तीन घोडेस्वार  पैकी एकावर अवसार येतो त्यामुळे तो घोडा पळत पुढे जातो तो पाटेकर देवस्थान होळीच्या सीमेपलीकडे जाऊ नये यासाठी मानवी साखळी तयार केली जाते हा क्षण लक्षणीय असतो.

4 / 5
घोडेमोडणी उत्सव याची तपासली दुपारी बारा वाजल्यापासून सुरुवात होते.ज्याना घोडेस्वार म्हणून पुढे येणारे युवक यांना पारंपरिक पोशाख परिधान करून फेटा बांधून सजवले जाते.नंतर मंदिराच्या बाहेर येऊन ग्रामदेवता श्री देवी शांतादुर्गा देवी सातेरी इतर देवतांना गाऱ्हाणे घालून ,मंदिराला होळीला प्रदक्षिणा घालून घोडमोडणी नाचण्याचा उत्सव सुरू करण्यात करण्यात येतो.

5 / 5
या घोडमोडणी उत्सव मधून वेगळा नजराणा बघायला मिळतो तर अनेक युवा पिढी ही कला आत्मसात करण्यासाठी पुढे सरसावत असल्याचे बघायला मिळते. साटेली गावातील शिमगोत्सव घोडेमोडणी म्हणजे वेगळं आकर्षक त्यामुळे अनेक गावांतील मंडळी गर्दी करतात .