उन्हाळी सुट्टीसाठी कोकणातील सर्वात सुंदर ठिकाणं, शेवटचे तर प्रचंड सुंदर, निसर्ग पाहून…

कोकणातील ही ठिकाणे तुम्हाला निसर्ग, शांतता आणि चविष्ट खाद्याचा अविस्मरणीय अनुभव देतील. यंदाच्या उन्हाळी सुट्टीत या सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या!

| Updated on: Mar 24, 2026 | 5:46 PM
1 / 5
उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की अनेक जण थंड हवेच्या ठिकाणांचा विचार करतात. मात्र, कोकणातील निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे आणि खास कोकणी खाद्यसंस्कृती यामुळे हा भाग पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.

उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की अनेक जण थंड हवेच्या ठिकाणांचा विचार करतात. मात्र, कोकणातील निसर्गसौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे आणि खास कोकणी खाद्यसंस्कृती यामुळे हा भाग पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.

2 / 5

निळाशार समुद्र यांचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर गुहागर हे शांत आणि सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते. इथले बीच स्वच्छ असून कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहेत.

3 / 5

गर्दीपासून दूर शांतता अनुभवायची असेल तर वेंगुर्ला हे ठिकाण उत्तम आहे. येथील शुभ्र वाळूचे समुद्रकिनारे आणि सुरूची झाडे मनाला प्रसन्न करतात. वेंगुर्ला लाईटहाऊस, मोचेमाड बीच आणि शिरोडा बीच ही ठिकाणे बघण्यासारखी आहेत.

4 / 5

उन्हाळ्यातही आल्हाददायक हवामानासाठी दापोली प्रसिद्ध ठिकाण आहे. येथील हिरव्यागार झाडीत वसलेले समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात. मुरुड बीच, कर्डे बीच आणि सुवर्णदुर्ग किल्ला ही ठिकाणे बघण्यासारखी आहेत.

5 / 5

वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायव्हिंगसाठी तारकर्ली हे कोकणातील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. इथले पाणी इतके स्वच्छ आहे की समुद्राचा तळही स्पष्ट दिसतो. तारकर्ली बीच, देवबाग संगम आणि बॅकवॉटर राईड हा अनुभव पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us