
जेव्हा आपण नवीन रेफ्रिजरेटर, एसी किंवा गीझर खरेदी करतो, तेव्हा दुकानदार आपल्याला 'स्टार रेटिंग' (Star Rating) किती आहेत हे आवर्जून सांगतो. पण, अनेकांना या स्टार रेटिंगचा नेमका अर्थ काय आणि त्याचा आपल्या विजेच्या बिलावर कसा परिणाम होतो, याबद्दलची कोणतीही माहिती नसते.

आज आपण हे स्टार रेटींग नेमके कशासाठी असतात, याबद्दल जाणून घेणार आहोत. उपकरणांवर दिसणारे १ ते ५ पर्यंतचे हे स्टार म्हणजे 'बीईई लेबल्स' (BEE Labels) आहेत.

BEE चा अर्थ 'ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी' (Bureau of Energy Efficiency). असा होतो. ही भारत सरकारची एक संस्था आहे, जी देशात ऊर्जा (वीज) वाचवण्याचे काम करते.

हे स्टार रेटिंग उपकरण एका वर्षात किती वीज वापरते हे दर्शवते. फाइव्ह स्टार उत्पादन असलले सर्वात कमी वीज वापरते, ज्यामुळे तुमचे वीज बिल लक्षणीयरीत्या कमी येते. तर वन स्टार उत्पादन सर्वात जास्त वीज वापरते.

बीईई लेबलवर फक्त स्टार नसतात, तर खालील महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या असतात. तुमचा दरवर्षी वार्षिक वीज वापर किती होतो, याबद्दलची माहिती तुम्हाला या आकड्यांद्वारे मिळते. एक वर्षात तुमचे उपकरण किती युनिट्स वीज वापरेल याची माहिती देतो.

लेबल कालावधी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. लेबलवर एक 'तारीख' दिलेली असते, जी दर्शवते की हे रेटिंग किती काळासाठी वैध आहे. ऊर्जे वापर नियम दर दोन-तीन वर्षांनी बदलतात. त्यामुळे, नवीन लेबल (अद्ययावत कालावधी) असलेले उत्पादनच खरेदी करा. जुने लेबल असलेले उत्पादन कमी फायदेशीर ठरू शकते.

जेव्हा एखादे उपकरण 'बीईई प्रमाणित' (BEE Certified) असते, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की कंपनीने ते उत्पादन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहे. प्रयोगशाळेने त्याची वीज वापर कार्यक्षमता तपासली आहे. बीईईने ते सुरक्षित आणि ऊर्जा-बचत करणारे असल्याचा शिक्कामोर्तब केला आहे.

म्हणूनच, दर महिन्याला विजेच्या बिलावर बचत करण्यासाठी, अधिक स्टार रेटिंग असलेले प्रमाणित उत्पादन निवडणे नेहमीच फायदेशीर ठरते. या साध्या नियमाचे पालन करून तुम्हाला स्वतःचे आर्थिक नियोजन मजबूत करता येऊ शकते.