
विमानातून प्रवास करताना, विमान उड्डाण घेत असताना प्रवाशांना फोन फ्लाईट मोडवर टाकण्याची विनंती करण्यात येते. काय आहे त्यामागील लॉजिक?

मोबाईल फोनमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी (electromagnetic interference, EMI) विमानाच्या संवदेशनशील नेव्हिगेशन आणि रेडिओ, GPS आणि ऑटोपायलट सिस्टिमच्या संप्रेषण उपकरणांमध्ये अडथळा आणण्याची शक्यता आहे.

मात्र आता अत्याधुनिक विमानात ही जोखीम कमी झाली आहे. कारण यामध्ये असे हस्तक्षेप टाळण्यासाठी खास व्यवस्था असते. सुरक्षेसाठी खास तंत्रज्ञान असते. टेक ऑफ आणि लँडिंगवेळी ही यंत्रणा काम करते.

फ्लाईट मोडमुळे फोनचे रेडिओ सिग्नल ( 4G/5G, Wi-Fi, वा ब्लूटूथ) बंद होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत

टेक ऑफ पूर्वी फोन फ्लाईट मोडवर ठेवल्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या विमानात अडथळे येण्याची शक्यता नसते. कारण आता विमानात इलेक्ट्रोमॅग्नेटिक अडथळा टाळण्यासाठी एक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. तरीही काही अडचणी येऊ शकतात.

जर फोन फ्लाईट मोडवर नसेल तर कॉल आणि नोटिफिकेशनच्या आवाजाने प्रवाशांचे लक्ष विचलित होऊ शकते. टेक ऑफवेळी काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात येतात, त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.