
होंडा SP125 , 125 सीसी कॅटेगरीतील सर्वात चांगली कॉम्प्युटर केंद्रीत मोटार सायकलीपैकी एक आहे. यात एक 123.94 सीसी इंजिन असून सुमारे 10.87 पीएसची पॉवर जनरेट करते. सुमारे 63 किमी/लिटरची मायलेज देते. याची किंमत रुपये 85,564 एक्स-शोरूम आहे.

होंडा CB125 हॉर्नेट या कॅटगरीत ही सर्वात स्पोर्टी बाईक आहे. यात 123.94 सीसीचे सिंगल सिलींडर इंजिन आहे. ते 11.14 PS पॉवर देते. जे एका स्मुथ गिअरबॉक्स आणि रिफाईंड पॉवर डिलीव्हरीसह आहे. हीचा 12-लिटरचा टँक आणि मिड- रेंज टॉर्क हिला शहराच्या अनुकूल बनवतो. हीची किंमत रुपये 1.03 लाख एक्स-शोरूम आहे.

बजाज पल्सर N125 ही दमदार लुक असलेली 125 सीसी सेगमेंटमध्ये आहे.यात 124.4 सीसीचे इंजिन असून ते सुमारे 11.8 पीएस आणि 10.8 एनएम जनरेट करते. बाईकचे कर्ब वजन सुमारे 140 किलोग्रॅम आहे. हीची किंमत रुपये 91,691 एक्स-शोरूम आहे.

टीव्हीएस रेडर 125 , 125 सीसी कॅटगरीतील सर्वात दमदार बाईकपैकी एक आहे. जी दमदार परफॉर्मेंसह सेगमेंटमध्ये अग्रणी फिचर्ससह येते. यात 124.8 सीसीचे इंजिन असून ते सुमारे 11.38 पीएसची पॉवर देते, आणि सुमारे 72 किमी/लिटर मायलेज देते. हीची किंमत रुपये 80,500 एक्स-शोरूम आहे.

हीरो एक्स्ट्रीम 125R पॉवर, फिचर्स आणि इंजिनचा एक शानदार कॉम्बो आहे. यात 124.7 सीसीचे इंजिन असून ते सुमारे 11.55 पीएसची पॉवर देते. बाईकचे डिझाईन स्पोर्टी आणि आधुनिक आहे. यात एक सरळ स्टान्स, मस्क्युलर फ्युल टॅक आणि शार्प टेल सेक्शन आहे. हीची किंमत रुपये 89,000 एक्स-शोरूम आहे.