30 हजाराच्या बजेटमध्ये बेस्ट स्मार्टफोन हवा, तर हे पर्याय पाहा
जर तुम्ही तीस हजार रुपयांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे फोन चांगले पर्याय असू शकतात. या वर्षी अनेक फोन लाँच झाले आहेत. ज्यामुळे मिड-रेंजच्या सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. या बजेटमध्ये केवळ चांगला कॅमेरा आणि मोठी बॅटरीच नाही तर युजरना फोनचा लूक देखील चांगला मिळत आहे.

Motorola Edge 70 - जर तुम्हाला स्लीम आणि हलक्या वजनाचा फोन हवा तर Motorola Edge 70 शानदार पर्याय आहे. हा फोन केवळ 5.99mm पातळ आणि 159 ग्रॅम वजनाचा फोन आहे. फोनमध्ये Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर देण्यात आला असून तो चांगला परफॉर्मन्स देतो. यात प्रीमियम डिझाईन सह मजबूत बिल्ड क्वॉलिटी देखील मिळते. याची किंमत ₹29,999 आहे.

Nothing Phone (4a) - जर तुम्ही कॅमेरा क्वालिटीला प्राथमिकता देत असाल तर Nothing Phone (4a) तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. यात 50MP टेलीफोटो कॅमरा देण्यात आला आहे, जो 3.5x ऑप्टिकल झूम सपोर्ट करतो. फोनची फोटो क्वालिटी, पोर्ट्रेट मोड आणि डिझाईन यास खास बनवतात. तसेच यात क्लीन आणि ब्लोटवेअर -free सॉफ्टवेयर मिळते. याची किंमत ₹31,999 आहे.

Realme P4 Power - जर तुमची प्राथमिकता बॅटरी बॅकअपची आहे तर Realme P4 Power शानदार फोन आहे. यात 10,001mAh क्षमतेची सुपर तगडी बॅटरी दिली असून ती दीर्घकाळ चालते. PCMark टेस्टमध्ये या फोन 21 तासांहून अधिक काळ रनटाईम दिला होता. यात 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो. याची किंमत ₹26,999 आहे.

Motorola Edge 70 Fusion - या बजेटमध्ये हा स्मार्टफोन संतुलित मानला जात आहे. यात 6.78 इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले दिलेला असून त्यामुळे शानदार सुस्पष्ट चित्र दिसते. या फोनमध्ये Snapdragon 7s Gen 4 प्रोसेसर आहे, ज्यामुळे रोजचा वापर स्मूद होतो. यात 7000mAh तगडी बॅटरी आहे.ही एक दिवस आरामात चालते. या फोनचे डिझाईन स्लीम आणि प्रीमियम आहे. याची सुरुवातीची किंमत ₹26,999 आहे.

Oppo K13 Turbo - जर तुम्हाला गेमिंग पसंद आहे तर OPPO K13 Turbo तुमच्यासाठी शानदार पर्याय आहे. यात MediaTek Dimensity 8450 चिपसेट देण्यात आला आहे. ज्याने AnTuTu टेस्टमध्ये 16 लाखाहून अधिक स्कोर केला आहे.फोनमध्ये एक्टीव्ह कुलिंग फॅन दिलेला आहे.त्यामुळे दीर्घकाळ गेमिंग सेशनमुळे फोन जास्त गरम होत नाही. BGMI आणि CODM सारखे गेम्स यात स्मूद चालते.याची किंमत ₹27,999 आहे.