
RITES च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मंगळवारी जोरदार परतावा दिला. या स्टॉकने दिवसभराच्या व्यापारी सत्रात जवळपास 13 टक्क्यांची तेजी घेतली. तर अखेरीस तो 293.85 वर व्यापार करत होता.

तर दुसरीकडे RVNL च्या शेअरमध्ये जबरदस्त तेजीचे सत्र दिसले. हा शेअर 7.7 टक्क्यांच्या तेजीसह 439.70 अंकांच्या उच्चांकावर पोहचला.

RVNL सारखाच IRCON चे शेअर मंगळवारी जोरदार उसळले. हा स्टॉक कालच्या किंमतीपेक्षा 4.8 टक्क्यांच्या तेजीसह 219 रुपयांच्या तेजीवर पोहचला.

Titagarh रेल्वे सिस्टिमचा शेअर काल 1101.90 रुपयांवर ट्रेड करत होता. त्याने आज 4.7 टक्क्यांची उसळी घेतली. तो 1153.75 उच्चांकावर पोहचला.

RailTel चा शेअर मंगळवारी जवळपास 2.46 टक्क्यांच्या तेजीसह 402.55 वर ट्रेड करत होता. व्यापारी सत्रा दरम्यान हा शेअर 412.90 उच्चांकावर पोहचला.

Jupiter Wagons चा शेअर मंगळवारी 1.5 टक्के तेजीसह 493.25 वर ट्रेड करत होता. तो व्यापारी सत्रात 502.65 उच्चांकावर पोहचला.