
धर्मशास्त्रात ब्रह्म मुहूर्ताला सर्वात शक्तीशाली वेळ मानले जाते. जी व्यक्ती आपल्या दिवसाची सुरुवात बह्म मुहूर्तावर करते त्याच्यावर लक्ष्मीची कृपा असते, असे मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार सकाली तीन ते पाच यादरम्यानचा काळ हा ब्रह्म मुहूर्त असतो. यालाच अक्षय मुहूर्तही म्हटले जाते. या वेळेत कोणतेही शुभ कार्य, पूजापाठ केल्यास चांगले फळ मिळते असे बोलले जाते.

ब्रह्म मुहूर्तादरम्यान सकारात्मक उर्जा सर्वाधिक असते, असे मानले जाते. या काळात वातावरण शांत असते. या काळात मनाला एकाग्र करणे सोपे असते.

म्हणूनच जे लोक ब्रह्म मुहूर्तावर उठतात त्यांनी विचार करण्याची क्षमता चांगली असते असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्म मुहूर्त हा चमत्कारी वेळ असतो. या काळात केलेल्या साधनेला चांगले फळ मिळते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.