Winter Tourist Places: शिमला, मनाली विसरून जाल; गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातील या ठिकाणी फिरायला जा

Best Winter Tourist Places in Maharashtra: थंडीच्या दिवसात अनेकांना फिरायला जायला आवडते. पण अशा वेळी बजेट फ्रेंडली, जवळच असलेली ठिकाणी कोणती? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया ही ठिकाणे कोणती आहेत?

| Updated on: Nov 21, 2026 | 10:07 AM
1 / 6
राज्यातील किमान तापमानात आज अचानक मोठी घसरण झाली आहे. एकंदरीतच गुलाबी थंडीची चाहूल पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सगळीकडे स्वेटर, मफलर घालून लोक फिरताना दिसणार आहेत. या थंडीचा आनंद घेण्यासाठी अनेकजण फिरायला जातात. त्यात डिसेंबरमध्ये मुलांना शाळेला सुट्टी देखील असते. पण थंडीमध्ये कुठे फिरायला जावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया...

राज्यातील किमान तापमानात आज अचानक मोठी घसरण झाली आहे. एकंदरीतच गुलाबी थंडीची चाहूल पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सगळीकडे स्वेटर, मफलर घालून लोक फिरताना दिसणार आहेत. या थंडीचा आनंद घेण्यासाठी अनेकजण फिरायला जातात. त्यात डिसेंबरमध्ये मुलांना शाळेला सुट्टी देखील असते. पण थंडीमध्ये कुठे फिरायला जावे? असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया...

2 / 6

शनिवार आणि रविवार जर तुम्हाला या थंडीत फिरायला जायचे असेल तर महाराष्ट्रात देखील चांगली ठिकाणे आहेत. आता ही ठिकाणे कोणती आहे? तिथे जाण्याचा जास्त खर्च होतो का? याविषयी जाणून घेऊया...

3 / 6

थंडीमध्ये फिरायला जाण्यासाठी खंडाळा आणि लोणावळा ही दोन्ही ठिकाणे चांगली आहे. मुंबईपासून अगदी हकेच्या अंतरावर असलेले हे ठिकाण हिवाळ्यात अतिशय सुंदर आहे. येथे जाण्याचाही फार खर्च होत नाही.

4 / 6

दुसरे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. येथे थंडीमध्ये प्रचंड गर्दी होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर हे पश्चिम घाटाच्या टेकड्यांमध्ये वसलेले आहे. येथे घनदाट जंगले, तलाव आणि समुद्रसपाटीपासून उंचीवर बसलेले अनेक पॉईंट्स आहेत. तुम्ही जर इथे फिरायला जायचा विचार करत असाल तर हे ठिकाण चांगले आहे.

5 / 6

भीमाशंकर हे देखील हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी चांगले ठिकाण आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर हे पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर बसलेले आहे. घनदाट जंगल, धार्मिक स्थळ असलेले भीमाशंकर हा देखील उत्तम पर्याय आहे.

6 / 6

महाबळेश्वर पासून केवळल वीस किलोमीटर अंतरावर असलेले पाचगणी देखील हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी योग्य ठिकाण आहे. पाचगणी येथील मुख्य आकर्षण वाय टेबल, 12 डोळे आणि बाबा ब्राह्मण मंदिर हे आहेत. येथे तुम्ही ट्रेकिंगचा देखील अनुभव घेऊ शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us