एका क्षणात 4 मजली इमारत कोसळली, 5 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचे थरकाप उडवणारे फोटो

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

| Updated on: Jul 31, 2026 | 8:57 AM
1 / 6
मुंबईजवळील भिवंडीत गुरुवारी रात्री कोहीनूर ही धोकादायक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. चार मजली इमारत कोसळल्याने परिसरात एकच धावाधाव झाली.

मुंबईजवळील भिवंडीत गुरुवारी रात्री कोहीनूर ही धोकादायक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. चार मजली इमारत कोसळल्याने परिसरात एकच धावाधाव झाली.

2 / 6

भिवंडीत रात्री इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. ढिगाऱ्याखाली 10 तासानंतर चौथा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलं आहे.

3 / 6

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण असल्याची माहिती मिळत आहे. चार मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यानंतर पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

4 / 6

तिन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील आय जी एम सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. चौघांच्या मृत्यूने भिवंडी परिसरात शोककळा पसरली आहे.

5 / 6

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, इमारत कोसळल्यानंतर जवळपास 8 ते 10 जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, भिवंडी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे वाहने, पालिकेची अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

6 / 6

इमारत कोसळण्याच्या आधी आवाज येत होता. या आवाजामुळे काही जण भितीने इमारतीच्या बाहेर आले होते. त्यामुळे या घटनेत मोठी दुर्घटना टळली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us