
आज पवन सिंह या अभिनेत्याला संपूर्ण देश ओळखतो. विशेष म्हणजे हा अभिनेता गायकदेखील आहे. भोजपुरी सिनेमामध्ये या अभिनेत्याला मानाचे स्थान आहे. याच हिरोन आता लग्न केल्याची चर्चा चालू आहे. पवन सिंह याने नुकताच आपला 40 वा वाढदिवस साजरा केला.

याच प्रसंगाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून याच व्हिडीओच्या आधारे पवन सिंहने लग्न केले आहे का? असे विचारले जात आहे. पवन सिंह याने आपल्या वाढदिवसाचा केक कापला. यावेळी त्याच्यासोबत एक तरुणी दिसत आहे.

या तरुणीच्या डोक्यावर सिंदूर लावलेला दिसत आहे. विशेष म्हणजे या तरुणीचा हात हातात घेऊनच पवन सिंह याने आपल्या वाढदिवसाचा केक कापला आहे. या संपूर्ण सेलिब्रेशनमध्ये ही तरुणी पवन सिंहसोबतच होती. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणीचे नाव महिमा सिंह असे आहे.

महिमा भोजपुरी सिनेमामधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. ती उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील आहे. तिचे आतापर्यंत अनेक म्युझिक व्हिडीओ आलेले आहेत. भोजपुरी सिनेमातही ती आता आपले स्थान बळकट करत आहे.

पवन सिंह याने याआधीच दोन वेळा लग्न केलेले आहे. महिमा सिंह हिच्या कपाळावरचा सिंदूर पाहून आता पवन सिंहने तिसरे लग्न तर केलेले नाही ना? असा सवाल विचारला जातोय. सोबतच महिमाने लावलेला सिंदूर हा शूटिंगदरम्यानचा असावा असाही तर्क लावला जातोय.