
बिग बॉसच्या घरामध्ये वैभव चव्हाण आणि इरिना रुदाकोवा या दोघांच्या नाात्याबद्द फार चर्चा झाली होती. आता दोघेही बाहेर पडलेत. नुकताच वैभव बाहेर आला असून त्याला इरिनाबाबत विचारल्यावर त्याने मोकळ्या मनाने उत्तर दिलं.

इरिनाची आठवण आली. ते गेली तेव्हा मी खूप शांत झालो होतो. एकच व्यक्ती होती जी मला सपोर्ट करत होती. कोणी काही बोलले तरी मी तुझ्यासोबत आहे, असं इरिना मला म्हणाली होती. चांगली मैत्रिण मला भेटली. मला जेवढे जमलं तेवढ मी तिला सपोर्ट केल्याचं वैभवने सांगितलं.

बारामतीला घेऊन जाणार का? फिरवणार ना बारामती, का नाही, तिला वेळ असेल तर घेऊन जाईल. शेती काय असती ती दाखवील, आमचा बाँड एकदम छान होता. त्यामध्ये वेगळ्या काही भावना नव्हत्या, मैत्रिची नाते आहे आणि ते असंच टिकून राहावं अशी माझी इच्छा आहे, असं वैभव चव्हाण म्हणाला.

बी टीममध्ये अंकिता, अभिजीत आणि डीपी दादा हे शेवटच्या फेरीपर्यंत जाईल. सगळ्यात खतरनाक म्हणजे सुरज आहे, तो असा व्यक्ती आहे की सगळे म्हणतात त्याला गेम कळत नाही. मीसुद्धा घरात असताना असंच समजत होतो. गेम न कळता तो जर इतकं काही करू शकतो तर मग गेम समजल्यावर काय करेल अन् काय नाही, असं वैभव चव्हाण म्हणाला.

इरीना रुदाकोवा आणि वैभव आता दोघेही बाहेर गेले असले तरीसुद्धा दोघांची चांगलीच चर्चा घरात असताना झाली होती. इराना आणि वैभव दोघेही एकमेकांना आवडू लागल्याचं सोशल मीडियावर बोललं जात होतं.