
बिग बॉस 15 चा ग्रॅण्ड फिनाले सुरु झाला आहे. या कार्यक्रमाला बिग बॉसच्या 15 व्या सिझनचे सर्व स्पर्धक त्यांच्या मित्रमैत्रिणींना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. राकेश बापट, शमिता शेट्टीची आई सुनीता शेट्टी, करण कुंद्राच्या घरच्या मंडळींचा समावेश आहे.

बिग बॉसमधून सगळ्यात आधी घराबाहेर पडलेली विधी पंड्यादेखील तिथे आली आहे. तसंच या शोचे पहिले लव्ह बर्ड्स इशान आणि मायशादेखील आलेले पहायला मिळाले. माईशाने ग्रे कलरची साडी नेसली आहे.

निशांत भट्ट आणि रश्मी देसाई बिग बॉस 15 मधून बाहेर पडले आहेत. निशांतने 10 लाखांची रक्कम घेऊन या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

मागच्या दोन दिवसांपासून हा कार्यक्रम चित्रित होतोय. लाईव्ह व्होटिंगमुळे सर्वांनीच कालच्याच कपड्यांमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावली आहे

पहिल्यांदाच बिग बॉस 15 चा ग्रँड फिनाले दोन भागांमध्ये दाखवला जाणार आहे. रात्री 8 ते 9 या वेळेतील भाग टीव्हीवर दाखवण्यात आला आहे. 'हुनरबाज' या रिअॅलिटी शोमुळे या फिनालेचा उर्वरित भाग रात्री 10 वाजेनंतर दाखवण्यात येणार आहे.