Bigg Boss 19 Contestant List: अमाल मलिक ते प्रणित मोरे; पाहा बिग बॉस 19मध्ये दिसणाऱ्या कलाकारांची यादी

आज, 24 ऑगस्ट पासून बिग बॉस १९ला सुरुवात झाली आहे. यंदाच्या सिझनमध्ये कोणते कलाकार दिसणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता अखेर या स्पर्धकांचा चेहरा समोर आला आहे. पाहा यादी...

| Updated on: Aug 24, 2025 | 10:54 PM
1 / 15
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. बॉलिवूडचा दबंग खान सलमान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचा १९वा सिझन सुरु झाला आहे. या शोमध्ये कोणते कलाकार दिसणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आता अखेर बिग बॉस स्पर्धकांचा चेहरा समोर आला आहे. पाहा यादी...

2 / 15
बिग बॉस १९च्या घरात सर्वात पहिली एण्ट्री करणारी स्पर्धक ठरली अशनूर कौर. वयाच्या २१व्या वर्षी स्वत:चं घर घेणारी अशनूर बिग बॉसचा खेळ कसा खेळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

3 / 15
‘गँग्स ऑफ वासेपूर २’ या वेब सीरिजमध्ये ‘डेफिनिट’ हे पात्र साकारणारा अभिनेता झिशान कादरी बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. त्याची या सीरिजमधील भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती.

4 / 15
तान्या मित्तल ही बिग बॉसच्या घरात आली आहे. तिने पहिल्याच दिवशी सलमानकडे खास मागणी केली होती. त्यानंतर सलमानने तिला चांदीची पाण्याची बाटली आणि ताट गिफ्ट म्हणून दिले आहे.

5 / 15
डान्सर आणि सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारे कपल नगमा मिराजकर व आवेज दरबार हे बिग बॉस 19मध्ये दिसणार आहेत.

6 / 15
२०१८ मध्ये मिस दिवा युनिव्हर्स राहिलेली नेहा चुदासमा 'बिग बॉस १९' मध्ये सामील झाली आहे. मॉडेल असण्यासोबतच ती फिटनेस कन्सल्टंट देखील आहे.

7 / 15
नेहल चुडासमा नंतर, अभिनेते अभिषेक बजाज आणि बशीर अली यांनी बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केला आहे. दोघांनीही एकत्र घरात प्रवेश केला आहे. आता हे एकत्र घरामध्ये त्यांचा खेळ खेळणार का हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

8 / 15
'अनुपमा' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता गौरव खन्ना बिग बॉस १९च्या घरात दिसणार आहे. सर्वांच्या आवडत्या गौरवचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक आता आतुर आहेत.

9 / 15
 ‘हाउसफुल 5’, 'वॉर २' या सिनेमामध्ये काम केलेली आंतरराष्ट्रीय कलाकार नटालिया जानोसजेकदेखील सहभागी झाली आहे. ती बिग बॉसच्या घरात तिचा खेळ कसा खेळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

10 / 15
मराठमोळा स्टँडअप कॉमेडीयन प्रणीत मोरे देखील बिग बॉस १९मध्ये दिसणार आहे. आता प्रणीत बिग बॉसच्या घरात किती दिवस टिकणार, कसा खेळ खेणार हे पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक आतुर आहेत.

11 / 15
'नोटबूक' आणि 'लैला मजनू' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री फरहाना भट्ट देखील या शोमध्ये सामील झाली आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक समाजसेविका आहे.

12 / 15
भोजपुरी सिनेमांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली नीलम गिरीही सलमान खानच्या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. तिने 'यूपी-बिहार लुटने' आणि 'तू आई नहीं' सारख्या गाण्यांवर डान्स करून या शोमध्ये एण्ट्री केली आहे.

13 / 15
फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकणारी अभिनेत्री कुनिका सदानंदने छोट्या पडद्याच्या माध्यमातून पुनरागमन केले आहे. तिचा बिग बॉसच्या घरातील खेळ कसा असणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.

14 / 15
निर्मात्यांनी आधीच मृदुल तिवारी आणि शाहबाज बदेशा यांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर, ज्याला चाहत्यांकडून सर्वाधिक मते मिळतील तो या घराचा भाग होईल. मृदुल तिवारीला सर्वाधिक मते मिळाली आणि तो या शोचा भाग झाला आहे.

15 / 15
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अमाल मलिक देखील सलमान खानच्या शोचा भाग बनला. त्याने 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटातील एक गाणे गाऊन प्रवेश केला. तो या शोचा १६ वा स्पर्धक आहे.