
बिग बॉस 17 धमाका करताना दिसत आहे. मात्र, नुकताच बिग बॉस 17 मधील स्पर्धेक अनुराग डोबाल याने सलमान खान याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. त्याने थेट बिग बॉसकडे तक्रार करत म्हटले की, माझ्या ब्रोसेनाचा सलमान खानने अनेकदा मजाक उडवला आहे.

हे काय पहिल्यांदा नाही की, एखाद्या बिग बॉसच्या घरातील स्पर्धेकाने सलमान खान याच्यावर आरोप केले. यापूर्वी रूबिना दिलैक हिने देखील सलमान खान याच्यावर आरोप केले. तिने थेट म्हटले होते की, सलमान खान याने माझ्या पतीला सामान म्हटले.

कविता कौशिक हिने देखील सलमान खान याच्यावर आरोप करत थेट म्हटले होते की, सलमान खान हा विकेंडच्या वारमध्ये माझे काहीच ऐकून घेत नाही आणि तो मला बोलू देखील देत नाही.

प्रियंका जग्गा हिने देखील सलमान खान विरोधात आपला मोर्चा काढला होता. तिने थेट सलमान खान याच्यासोबत पंगा घेतला. त्यानंतर तिला थेट बिग बाॅसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

खान आणि सलमान खान यांच्यामध्ये देखील मोठा वाद बघायला मिळाला. थेट सलमान खान विरोधात त्याने पोलिसांमध्ये तक्रार देखील दिली होती. बिग बाॅसच्या घरातील वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेला होता.