Suraj Chavan Home Photos : पत्र्याचं घर ते आलिशान बंगला; सूरज चव्हाणचे घर आतून पाहिलेत का?

Suraj Chavan Home Photos :बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण सध्या चांगलाच चर्चेत आहे. सूरजने सोशल मीडियावर नव्या घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचा आलिशान बंगला दिसत आहे. आता हा बंगला आतुन कसा आहे चला पाहूया...

| Updated on: Nov 18, 2025 | 6:21 PM
1 / 5
बारामती तालुक्यातील मोढवे गावातून आलेला अतिशय गरीब कुटुंबातील रिल स्टार म्हणून सूरज चव्हाण ओळखला जातो. टिकटॉकवर लाखो यूजर्स असणारा सूरज रातोरात स्टार बनला. त्यानंतर त्याला बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळाली. बिग बॉसमध्ये सूरजच्या आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या. त्याने अतिशय खडतर दिवस काढून इथपर्यंतचा प्रवास केला आहे. आता सूरज चव्हाणच्या नव्या घराचे फोटो समोर आले आहेत.

2 / 5
आई-वडिलांशिवाय लहानचा मोठा झालेला सूरज हा एका पत्र्याच्या घरात राहात होता. आज याच पत्र्याच्या घराच्या जागेवर सूरजने आलिशान बंगला बांधला आहे. सूरजने बिग बॉस मराठी हा देखील जिंकला. त्यानंतर त्याने घराचे बांधकाम सुरु केले.  काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर त्यांनी स्वतः बांधकामाची पाहणी केली. अखेर हे घर पूर्ण झालं असून सूरजनं मोठ्या आनंदानं नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.

3 / 5
सूरजने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर घरातील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओवरुन सूरजचे नवे घर किती भव्य आहे हे दिसत आहे. घराच्या आत पाऊल टाकताच भलामोठा हॉल, त्यानंतर लगेच मॉड्युलर किचने, मोठ्या मोकळ्या जागेवर झाडे असे दिसत आहे. एकंदरीतच हे घर आतुन अतिशय सुंदर दिसत आहे. किचनमध्ये सूरजने पांढरा आणि आकाशी रंग दिला आहे. एकंदरीत त्याच्या घरातील मॉड्युलर किचन आकर्षक दिसत आहे.

4 / 5
सूरजचा बंगला हा दोन मजल्याचा आहे. तसेच मोठ्यामोठ्या खिडक्या, हाय सिलिंग आणि अनेक ठिकाणी चमकणाऱ्या काचा दिसत आहेत. बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर मोठ्या खोल्या असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर 'गुलीगत धोका' म्हणत फेमस झालेल्या सूरज चव्हाणने आपल्या घरातील प्रत्येक कोपरा दाखवला आहे. त्याने बेडरुमदेखील अतिशय आलिशान बनवला आहे.

5 / 5
सूरज चव्हाणचे लवकरच लग्न होणार आहे. येत्या 29 नोव्हेंबर 2025 रोजी सूरजच्या लग्नाची तारीख काढण्यात आली आहे. लग्नाआधी त्याने नव्या बंगल्यात गृहप्रवेश केला आहे. लग्नानंतर बायकोला घेऊन सूरज नव्या घरात येणार आहे. सूरजने अजित दादांना देखील लग्नाची पत्रिका दिली आहे. आता अजित दादा सूरजच्या लग्नाला हजेरी लावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच इतक कोणती कलाकार मंडळी उपस्थित असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.