
आधुनिक काळात सर्वकाही स्मार्ट होत आहे. त्यात बोटातील रिंगही मागे नाही. बोट कंपनीने स्मार्ट रिंग लाँच केली आहे.

या रिंगच्या माध्यमातून आरोग्याचा लेखाजोखा ठेवता येणार आहे. ही रिंग आकर्षक असून यात सर्व फीचर्स आहेत.

बोट कंपनीने ही स्मार्ट रिंग तयार करण्यासाठी सिरेमिक आणि मेटलचा वापर केला आहे. त्यामुळे ती आकर्षक दिसते. तसेच मजबूतही आहे. शरीराचं तापमान, एका दिवसात किती कॅलरी बर्न झाल्या यासारख्या तपशीलांची नोंद यातून घेता येईल. ही स्मार्ट रिंग स्मार्ट फोनला जोडून डेटा मिळवता येईल.

आकर्षक डिझाईनसह ही वजनाने हलकी, वापरण्यासाठी सुलभ आणि आरामात बोटात घालू शकतो. हार्ट रेट सेन्सर, SPO2 सेन्सर, स्लीप ट्रॅकर, पीरियड ट्रॅकर यासारखी वैशिष्ट्ये खासकरून महिलांसाठी आहेत.

बोट कंपनीने या स्मार्ट रिंगच्या किंमतीची घोषणा केलेली नाही. ही स्मार्ट रिंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर खरेदी करू शकता.