
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलच्या लग्नाला आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. बॉबीने आपली पत्नी तान्या देओलला शुभेच्छा दिल्या आहेत. पत्नीबरोबर फोटो शेअर करताना बॉबीने लिहिले आहे की, तु माझा दिल, माझी आत्मा, माझी जहान आहेस. मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करेल.

बॉबी देओलने पत्नी तान्यासोबत जो फोटो शेअर केला आहे, तो फोटो रोमँटिक आहे. चाहत्यांना बॉबीने शेअर केलेला फोटो अतिशय आवडला आहे.

बॉबीची पत्नी फिल्मी दुनियेपासून दूर आहे. मात्र, सौंदर्यात ती मोठ्या स्टार्सवर मात करेल एवढी सुंदर आहे. तान्या एक यशस्वी बिजनेस वुमन आहे. 30 मे 1996 रोजी तान्या आणि बॉबी देओलचे लग्न झाले होते.

तान्या आणि बॉबी देओल यांना आर्यमान देओल आणि धरम देओल अशी दोन मुले आहेत. बॉबी नेहमीच इंस्टाग्रामवर आपल्या पत्नीचे फोटो शेअर करत असतो.

इतकेच नव्हे तर तान्या एक इंटिरियर डिझाइनर देखील आहे. चित्रपट जुर्म आणि आणि नन्हे जैसलमेर या चित्रपटामध्ये कॉस्ट्यूम डिझायनर म्हणूनही देखील तान्याने काम केले आहे.

बॉबी आणि तान्या नेहमीच मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.