
शरीरासाठी कोलेस्टेरॉल आवश्यक आहे, पण त्याचे जास्त होणे हानिकारक ठरू शकते. विशेषतः जेव्हा एलडीएल म्हणजे वाईट कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा हृदयविकाराचा झटका, ब्लॉकेज आणि स्ट्रोकसारख्या समस्यांचा धोका वाढतो. अशा वेळी कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पण जेव्हा कॉलेस्ट्रॉल वाढते तेव्हा कोणती लक्षणे शरीरात दिसतात चला जाणून घेऊया...

शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यावर पायांमध्ये वेदना होतात. पायात गोळा आल्यासारखे वाटू लागते. खरे तर कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे, रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे चालताना किंवा विश्रांतीच्या स्थितीतही पायांमध्ये जडपणा किंवा आकडणे जाणवू शकते. अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करावी.

कोलेस्टेरॉलचे सर्वात गंभीर लक्षण म्हणजे छातीत वेदना किंवा दबाव जाणवणे. खरे तर, जेव्हा हृदयाच्या धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होते तेव्हा छातीवर दबाव जाणवतो, ज्यामुळे जळजळ किंवा तणावही होऊ शकतो. हे हृदयविकाराचा झटका किंवा कोरोनरी आर्टरी डिसीजचे संकेत असू शकते.

कोलेस्टेरॉल वाढल्यावर मानेच्या आसपास वेदना होऊ शकतात. खरे तर, जेव्हा रक्तप्रवाहात अडथळा येऊ लागतो तेव्हा मान, जबडा किंवा खांद्यांमध्ये खूप जास्त वेदना जाणवतात, जी अनेकदा तणाव किंवा स्नायू दुखणे वाटते. पण असे होत असले तर याकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका. तातडीने डॉक्टरांना दाखवा.

शरीरात वेदनेशिवाय इतर लक्षणेही दिसू शकतात. हात-पाय बधिर होणे, खरखरीत होणे किंवा थंडपणा जाणवणे सामान्य आहे. काही प्रकरणांमध्ये पायांचा रंग निळा पडतो कारण रक्तप्रवाह योग्यरित्या होत नाही. हे कोलेस्ट्रॉलचे सर्वात मोठे लक्षण आहे. हाय कोलेस्टेरॉल असलेल्या अनेकांना डोके जड वाटणे किंवा चक्कर येणे जाणवते. ज्यामुळे चढताना श्वास फुलणे किंवा लवकर थकवा येणेही या समस्येचे एक लक्षण असू शकते.

काही प्रकरणांमध्ये डोळ्यांच्या आसपास पिवळसरपणा येणे किंवा पिवळी वलये तयार होणे हेही कोलेस्टेरॉल वाढण्याचे संकेत असते. जर तुमच्या शरीरात असे बदल दिसले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, जेणेकरून स्थिती गंभीर होण्यापूर्वीच थांबवता येईल. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांच्या सल्लाने उपाय करा)