केसात माळलेला गजरा…. कानाच झुमके… पलक तिवारीने शेअर केले हळदीचे फोटो
Palak Tiwari Haldi Photos: अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी कायम नटण्यासाठी तयार असते... कोणत्याही स्टाईलमध्ये पलक प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसते. आता देखील पलक हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पलक हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

मोकळे केस... केसात माळलेला गजर... कानात झुमके आणि पारंपरिक लेहेंगा... या लूकमध्ये पलक तिवारी हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, चाहत्यांना देखील अभिनेत्रीला लूक प्रचंड आवडलेला आहे.

पलकने भरतकाम केलेला हिरवा लेहेंगा घातला आहे आणि ओढणीची रचनाही अनोखी आहे. अभिनेत्रीने वेणीने बांधलेली हेअरस्टाईल आणि गजरा देखील घातला आहे. कानातील लांब झुमक्यांमुळे पलक हिचा लूक आणखी सुंदर दिसत आहे.

मैत्रिणीच्या हळदीसाठी पलक हिने खास लूक केला आहे. फोटो पोस्ट करत पलक हिने कॅप्शनमध्ये, 'Yellow yellow my friend is a married fellow...' असं लिहिलं आहे. पलक हिनेच्या फोटोंवर अनेकांना लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी हिची लेक आणि अभिनेत्री पलक तिवारी हिला आज कोणत्याच ओळखीच गरज नाही. अभिनेता सलमान खान स्टारर 'किसी की भाई किसी की जान' सिनेमातून पलक हिने पदार्पण केलं.

पलक तिवारी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम याच्यासोबत अनेकदा पलक हिला स्पॉट करण्यात आलं आहे. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.