
दक्षिणेतली प्रसिद्ध अभिनेत्री शांति प्रियाच्या येणाऱ्या चित्रपटाच नाव 'बॅडगर्ल' आहे. 5 सप्टेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाची डायरेक्टर आणि रायटर वर्षा भारत आहे. या चित्रपटाचा प्रोड्यूसर अनुराग कश्यप आहे.

शांती प्रिया यांनी तामिळ आणि तेलुगू चित्रपटात काम केलय. बॉलिवूडमध्ये सौगंध (1991) हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात तिने पडद्यावर अक्षय कुमार सोबत रोमान्स केलेला. चित्रपट फ्लॉप ठरला. पण गाणी हिट ठरली.

शांति प्रियाने 'फूल और अंगार', 'मेहरबान', 'वीरता' आणि 'सजना साथ निभाना' सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. शांती प्रियाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन 35 वर्ष झाली आहेत. इतक्या वर्षात तिचा लुक खूप बदललाय.

55 वर्षाच्या शांती प्रियाने काही काळापूर्वी आपल्या डोक्यावरचे सर्व केस काढलेले. पूर्णपणे तिने टक्कल केलेलं. रिपोर्ट्सनुसार, सौंदर्याचे पारंपारिक निकष तोडणं आणि स्वत:ला सामाजिक अपेक्षांमधून मुक्त करण्यासाठी हे केल्याच शांती प्रियाने सांगितलेलं.

शांती प्रियाने ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर फॅन्स हैराण झालेले. आता तिच्या डोक्यावर केस येऊ लागले आहेत आणि ती बॉयकट स्टाइलमध्ये दिसतेय.