Nana Patekar : नाना पाटेकर या अभिनेत्याच्या पायांना मालिश करायचे, त्याबदल्यात मिळायचे 5 रुपये

Nana Patekar : नाना पाटेकर आज यशस्वी अभिनेते आहेत. त्यांच्याकडे सगळं काही आहे. पण त्यांचा इथवरचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. एककाळ असाही होता, नाना पाटेकर एका अभिनेत्याच्या पायांना आणि डोक्याची मालिश करायचे. त्या बदल्यात त्यांना 5 रुपये मिळायचे.

| Updated on: May 30, 2025 | 4:01 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर सध्या हाऊसफुल 5 या आपल्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नाना पाटेकर यांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केलाय. त्यांच्या मेहनतीमुळे आज ते इथवर पोहोचू शकलेत.

2 / 5
नाना पाटेकर यांनी एकदा एक किस्सा सांगितलेला. ते जेव्हा मुंबईत आले, तेव्हा एका व्यक्तीने त्यांना खूप सपोर्ट केलेला.

3 / 5
नाना पाटेकर यांनी पद्मश्री पुरस्कार विजेते अशोक सराफ यांच्याबद्दलची एक आठवण सांगितली. अशोक सराफ जिथे कुठे नाटकासाठी, शूटिंगसाठी जायचे, त्याआधी नाना पाटेकर त्यांच्या पायांची आणि डोक्याची मालिश करायचे.

4 / 5
या मालिशच्या बदल्यात अशोक सराफ त्यांना त्यावेळी 5 रुपये द्यायचे. मोकळ्यावेळेत दोघे पत्ते खेळायचे. या खेळात अशोक सराफ मुद्दाम हरायचे, जेणेकरुन नाना पाटेकर यांना काही पैसे मिळावेत.

5 / 5
नाना पाटेकर यांना अचानक पैशांची गरज लागली. त्यावेळी अशोक सराफ नाना यांच्याघरी ब्लँक चेक घेऊन गेले. म्हणाले 15 हजार रुपये अकाऊंटमध्ये आहेत, जितके पाहिजे तितके काढं.