
अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी जिनिलिया देशमुख हिच्या सौंदर्यावर असंख्य चाहते फिदा आहेत. जिनिलिया कोणत्याही लूकमध्ये सुंदर दिसते. अभिनेत्री सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते.

सध्या जिनिलिया हिचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द जिनिलिया हिने सोशल मीडियावर पांढऱ्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

खुद्द जिनिलिया हिने सोशल मीडियावर पांढऱ्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. पांढरी साडी, केसात माळलेला गजरा... आणि सिंपल लूकमध्ये जिनिलिया प्रचंड सुंदर दिसत आहे.

जिनिलिया दोन मुलांची आई आहे. पण अभिनेत्रीचं फिटनेस पाहून कोणीत म्हणणार नाही की, जिनिलिया हिला दोन मुलं असून ते शालेय शिक्षण पूर्ण करत आहेत.

रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर दोघांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दोघे कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. दोघे सोशल मीडियाच्या मााध्यमातून चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.