
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा कायमच चर्चेत असतो. सैफ अली खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सैफ अली खानने करीना कपूर हिच्यासोबत दुसरे लग्न केले.

सैफ अली खान याच्या पहिल्या पत्नीचे नाव अमृता सिंह आहे. 13 वर्षांनंतर यांचे नाते तुटले. अमृतानंतर सैफ अली खान याने करीनासोबत लग्न केले.

करीना कपूर हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर सैफ अली खान याने एक पत्र अमृता सिंहला पाठवले होते. यामध्ये त्याने लिहिले होते की, तो आयुष्यातील नवीन अध्यायला सुरूवात करतोय.

विशेष म्हणजे अमृता हिच्यासाठी लिहिलेले पत्र मुलगी सारा अली खान हिने देखील वाचले होते. या पत्रानंतर तिने लगेचच वडील सैफ अली खान यांना फोन केला.

हेच नाही तर सैफ अली खानच्या दुसऱ्या लग्नासाठी सारा अली खानला अमृता सिंहनेच तयार केले होते. करण जोहरच्या शोमध्ये सारा आणि सैफ अली खान हे पोहोचले होते, त्यावेळी हा खुलासा करण्यात आला.