
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने अत्यंत मोठा काळ हा अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. सलमान खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सलमान सोशल मीडियावर सक्रिय देखील असतो.

सलमान खान याचे नवीन फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्याचे हे फोटो पाहून लोकांना चांगलाच धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.

चक्क सलमान खान याला जवळचा चश्मा लागलाय. सलमान खान हा त्याच्या गाडीमध्ये बसून चक्क चष्मा लावून काहीतरी वाचताना दिसला. पापाराझी यांना पाहताच सलमान खानने तो गडबडीत चष्मा काढला.

म्हणजेच काय तर आता जवळचे वाचण्यासाठी सलमान खान याला चष्मा लावावा लागतो. आता सलमान खानचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये सलमान खान याला सोफ्यावरून उठताना त्रास होत असल्याचे बघायला मिळाले.