निधनापूर्वी सतीश शाह यांनी मला शेवटचा मेसेज केला अन्… सचिन पिळगावकरांनी केला खुलासा

ज्येष्ठ अभिनेते सतीश शहबा यांचे काल, 25 ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनापूर्वी सतीश शाह यांनी अभिनेते सचिन पिळगावकर यांना मेसेज केला होता. आता नेमकं ते काय म्हणाले होते चला जाणून घेऊया...

| Updated on: Oct 26, 2025 | 1:38 PM
1 / 5
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. 25 ऑक्टोबर रोजी वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. सतीश शाह यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र व ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर हे भावूक झाले आहेत,

2 / 5
सचिन पिळगावकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सतीश शाह यांच्या निधनाने मोठा धक्का बसला असे म्हटले आहे. तसेच सतीश शाह यांनी निधनापूर्वी मेसेज केला होता असे देखील सचिन म्हणाले.

3 / 5
"सुप्रिया तीनच दिवसांपूर्वी सतीश आणि मधुला भेटून आली होती. सतीश ने कोणतेतरी गाणे ऐकवले होते. त्यावर मधु आणि सुप्रियाने डान्स देखील केला होता. सतीश आणि मी नेहमी बोलायचो. एकमेकांना मेसेज करायचो. त्याचा मला आजच दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी मेसेज आला होता . त्यावेळी तो पूर्णपणे ठीक होता. पण त्याच्या निधनाची अचानक बातमी आली. या बातमीमुळे मला मोठा धक्काच बसला" असे सचिन म्हणाले.

4 / 5
सतीश शाह यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस कसे होते याविषयी बोलताना सचिन म्हणाले, "गंमत जंमत हा त्यांचा पहिला चित्रपट होता. आम्हाला एकत्र येण्यासाठी एक कारण हवे होते आणि 1987 चा हा चित्रपट ते कारण ठरले. त्यानंतर आम्ही कधीच एकत्र काम केलं नाही पण तिथेच आमची चांगली मैत्री झाली."

5 / 5
पुढे सचिन म्हणाले की, तुम्हाला खरोखर माहीत नसते की तुमच्या सोबत काय घडणार आहे. तुम्ही काहीच भाकीत करू शकत नाही. आनंदी राहणं आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना आनंदी ठेवणं हाच हेतू आहे. जो त्याने केला. तुमची वेळ कधी येईल हे तुम्ही नाही सांगू शकत.