Chhaava OTT Release: ‘छावा’ सिनेमा OTT वर होणार प्रदर्शित, कधी, कुठे आणि कसा? घ्या जाणून
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' सिनेमाचा बोलबाला आजही चाहत्यांमध्ये दिसत आहे. जवळपास 50 दिवस मोठ्या पडद्यावर सिनेमा प्रदर्शित झाला. आता सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ज्यांमुळे तुम्हाला सिनेमा घरबसल्या पाहाता येणार आहेत.

अभिनेता विकी कौशल स्टारर ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सिनेनाने तब्बल दोन महिने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कलेक्शन केलं. ‘छावा’ सिनेमाने फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील नवीन विक्रम रचले.

‘छावा’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनंतर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमा 11 एप्रिल 2025 मध्ये स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक जण सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक असतील… यात काही शंका नाही.

सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार अशी माहिती समोर येत आहे. पण सिनेमाचे डिजीटल राईट्स कोणाकडे आहेत… अद्याप समोर आलेलं नाही.

‘छावा’ हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारलेला आहे. यामध्ये विक्की कौशलने मराठा योद्ध्याची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.