
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न काही दिवसांपूर्वीच अत्यंत शाही पद्धतीने पार पडले. विशेष म्हणजे अनेक कलाकार हे या लग्नात सहभागी झाले. अनेक फोटो आणि व्हिडीओ या लग्नाचे व्हायरल होताना दिसले.

हेच नाही तर अनंत अंबानीच्या लग्नात धमाल करताना अनन्या पांडे दिसली. अनेक व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसली. फक्त अनन्याच नाही तर जवळपास सर्वच कलाकार या लग्नात डान्स करताना दिसले.

आता नुकताच अनंत अंबानीच्या लग्नाबद्दल अनन्या पांडे हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय. अनन्या पांडे म्हणाली की, तो माझा खूप जवळचा मित्र आहे आणि मित्राच्या लग्नात डान्स केला जातो.

लोक असे का विचार करतात तेच मला समजत नाही. अर्थात माझ्या मित्रांच्या लग्नात मी मनापासून नाचणार. मला माझा आनंद व्यक्त करायला आवडतो असेही अनन्या पांडे हिने म्हटले आहे.

विशेष म्हणजे काही महिने अनंत अंबानीच्या लग्नाचे प्री वेडिंग फंक्शन सुरू होते. अनन्या पांडेचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.