
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अलीकडेच अथियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

आयपीएल 2022 दरम्यान, बहुतेक सामन्यांमध्ये अथिया केएल राहुल आणि त्याच्या टीमला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचायची. अथियासोबत तिचे वडील सुनील शेट्टीही अनेकदा स्टेडियममध्ये दिसून आले होते.

अथिया शेट्टीही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दरम्यान, सुनील शेट्टीने अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

लवकरच दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे सुनील शेट्टीने सांगितले. ते म्हणाले, "मुलांनी ठरवताच आम्ही त्यांचे लग्न करू. सध्या शेड्यूल खूपच टाइट आहे.

रिपोर्ट्सनुसार, दोघांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोडवर या जोडप्याला घर मिळाले आहे.