
अभिनेत्री काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

नव्या लूकमध्ये काजोल प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढत आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही.

पांढऱ्या आणि काळ्या कपड्यांमधील फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Black and white come in all shades' असं लिहिलं आहे.

आजही चाहत्यांमध्ये काजोलची क्रेझ आहे. अभिनेत्रीचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहे.

सोशल मीडियावर काजोलच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.