
अभिनेत्री काजोल हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता अभिनेत्याच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

काजोल हिने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे.

फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये मी काय खाल्लं आणि प्यायली हे सर्वांना दिसत आहे... असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोलच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. काजोल आज बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.