Konkona Sen Sharma hospitalized: अचानक प्रकृती खालावली, थेट ICUमध्ये कोंकणा सेन शर्मा, नेमकं झालं तरी काय?
Konkona Sen Sharma hospitalized: अभिनेत्री कोंकणा सेन गुप्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉस्पिटलमधला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी कोंकणाला नेमकं काय झालं? असा प्रश्न विचारला आहे.

अभिनयाच्या जगातील प्रसिद्ध अभिनेत्री कोंकणा सेन शर्माला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता कोंकणा सेनला नेमकं काय झालं? तिच्या प्रकृती चिंताजनक तर नाही ना? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
कोंकणाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर रुग्णायात उपचार घेत असतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने डेंग्यू झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगितले आहे. तसेच कोंकणाची प्रकृती स्थिर असल्याची देखील माहिती तिने दिली आहे.
अभिनेत्रीने रुग्णालयाच्या बेडवरून आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
कोंकणा तिचा आगामी सिनेमा ‘लस्ट स्टोरीज ३’मुळेही चर्चेत आहे. शिवाय अमोल पाराशर यांच्यासोबतच्या अलीकडच्या रील व्हिडिओनंतरही त्या चर्चेत आली होती. पण आता तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर आरोग्याबाबत शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहते चिंता व्यक्त करत होते.
अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने जो फोटो पोस्ट केला आहे त्यात ती रुग्णालयाच्या बेडवर दिसत आहे. ती सॅल्यूट करताना दिसत आहे. या फोटोवर तिने लिहिले की मित्रांनो, डेंग्यूपासून सावध राहा. मी रुग्णालयात होते, पण आता बरे वाटत आहे. तिने लिहिले की लोकांनी डेंग्यूपासून सावध राहावे.