नोकरी मिळाली नाही म्हणून भारतात परतली, राणी मुखर्जीची PA बनली, ही अभिनेत्री आज 74 कोटीची मालकीण

तिला बँकर बनायचं होतं. तिला लंडनमध्ये नोकरी करण्याची इच्छा होती. पण मंदीमुळे तिला नोकरी मिळाली नाही. त्यानंतर तिने यशराज फिल्म्समध्ये पीआर म्हणून काम केलं.

| Updated on: Oct 22, 2025 | 2:37 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती  चोपडा आपल्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. परिणीती आणि राघव अलीकडेच माता-पिता बनले. परिणीतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. परिणीति चोपडा हे बॉलिवूडमधील एक मोठ नाव आहे. परिणीतीच आयुष्य सुरुवातीपासून सोपं आणि आरामदायी नव्हतं. तिने खूप स्ट्रगल केलाय.

2 / 5
 परिणीतीने एकदा सांगितलं की, तिला कधीही अभिनेत्री बनायचं नव्हतं. तिने खूप शिक्षण घेतलय. तिला त्याच क्षेत्रात काम करायचं होतं. आज ती कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण आहे. तिने 2012 साली अभिनेता अर्जुन कपूरच्या 'इश्कजादे' चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात केलेली. हा दोघांचा डेब्यू चित्रपट होता.

3 / 5
 त्यानंतर परिणीती 'लेडीज वर्सेस रिकी बहल' चित्रपटात दिसली. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रणवीर सिंह आणि एक्ट्रेस अनुष्का शर्मा होती. दोन्ही चित्रपटात तिचा लीड रोल होता.  परिणीतीने बॉलीवुडमध्ये 'शुद्ध देसी रोमांस', 'मेरी प्यारी बिंदू', 'अमर सिंह चमकीला', 'हंसी तो फंसी' सारख्या चित्रपटात काम केलय.

4 / 5
परिणीती एक हुशार विद्यार्थिनी होती. तिने ब्रिटनच्या प्रतिष्ठीत मॅन्चेस्टर बिझनेस स्कूलमधून बिझनेस, फायनान्स आणि इकोनॉमिक्स विषयात ट्रिपल ऑनर्सची डिग्री घेतली आहे. तिला बँकर बनायचं होतं. तिला लंडनमध्ये नोकरी करण्याची इच्छा होती. पण मंदीमुळे तिला नोकरी मिळाली नाही. त्यानंतर तिने यशराज फिल्म्समध्ये पीआर म्हणून काम केलं.

5 / 5
तिने अभिनेत्री राणी मुखर्जीकडे तिची पीए म्हणून काम केलेलं. इथे  डायरेक्टर मनीष शर्माचं तिच्यावर लक्ष गेलं. हळू-हळू ती अभिनेत्री बनली. तिच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास मिडिया रिपोर्ट्सनुसार तिची नेटवर्थ 74 कोटी रुपये आहे.