
अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांनी सिनेमात अर्ची आणि परशा ही भूमिका साकारली होती. चाहत्यांची दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. सिनेमातील दोघांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली.

2016 मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला. दरम्यान, एका मुलाखतीत रिंकू हिने आकाश याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

आकाशसोबतच्या बॉण्डिंगबद्दल रिंकू म्हणालेली, 'आमची मैत्री खूपच चांगली आहे. तेव्हापासून आम्ही चांगले मित्र आहोत. काहीही वाटलं तरी आम्ही दोघं एकमेकांसोबत बोलत असतो...'

'मी त्याला फोन करुन सांगितलं, मला बोअर होतंय... तू मुंबईत येशील का? किंवा पुण्यात गेल्यानंतर आम्ही एख्याद्या कॅफेमध्ये बसून गप्पा मरतो... हे पुस्तक वाचलं का? असं बोलत असतो... आम्ही सतत बोलत असतो. त्यामुळे आमच्यात खूप चांगली मैत्री आहे. मित्र म्हणून आमच्यात पारदर्शकता आहे.' असं रिंकू पुढे म्हणालेली.

अभिनेत्री रिंकू हिने फार कमी काळात स्वतःची ओळख निर्माण केली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.